प्रसारमाध्यमे म्हणजे काय? सांगून नवसमाज माध्यमांचे वेगळेपण सांगा. तसेच फेसबुक ट्विटर व ब्लॉग विषयी सविस्तर माहिती लिहा.

*शुभांगी कैलास शेळके*
प्रसार माध्यम म्हणजे काय? सांगून नवसमाज माध्यमांचे वेगळेपण सांगा तसेच फेसबुक ट्विटर व ब्लॉग विषयी सविस्तर माहिती लिहा.
उत्तर:-
प्रसार म्हणजे पसरविणे असा त्याचा अर्थ होतो.अणि माध्यम म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो त्याला माध्यम म्हणतात.  माझ्या लिहिलेल्या लेखांमधुन मी तुम्हा सर्वांसमोर व्यक्त होत असते .माझ्या भावना,विचार,माझ्या मनातील राग,वेदना,तळमळ इत्यादी सर्व काही मी माझ्या शब्दांमधुन तुम्हा सर्वांसमोर व्यक्त करत असते .म्हणजेच लिहिणे हे माझे व्यक्त होण्याचे माध्यम आहे.त्यादवारे मी तुम्हा सर्वांसमोर माझे विचार,भावना,तगमग,तळमळ,वेदना मी मांडत असते .म्हणजेच लिहिणे हे माझे तुम्हा सर्वासमोर व्यक्त होण्याचे माझे माध्यम आहे असे आपणास या सर्वातुन स्पष्टपणे दिसुन येते.
    म्हणजेच मी माझ्या लिहिण्यातुन शब्दांदवारे माझ्या भावना व्यक्त करते अणि ते शब्द जे मी तुम्हा सर्वासमोर मांडते  ते माझे तुम्हा सर्वासमोर व्यक्त होण्याचे माध्यम ठरते.
(1) सामाजिक परिवर्तनासाठी सोशल मीडिया.
उत्तर:-
प्रसार माध्यमे समाजाचा महत्वपूर्ण स्तंभ आहेत. प्रसार माध्यमांकडून केवळ घटनांचा फक्त अहवाल दिला जातो असे नाही तर ते जनमत ही तयार करतात.
सोशल मीडियाच्या (SM) उदयामुळे प्रसार माध्यमांचे स्थान आता बरेच बदलले आहे. सोशल मीडिया मुळे लोकांना सर्वत्र डोळे व कान लाभले आहेत. ते काही टीव्ही चॅनेलच्या कॅमेराकर्मीं पुरते मर्यादित नाहीत. सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे जे प्रत्यक्ष जनमत अशाप्रकारे दर्शवते की ज्यात सहज फेरफार करणे कठीण असते. ही सोशल मीडिया समाजाची नाडी प्रतिबिंबित करतात. पारंपारिक मीडिया चॅनेलसुद्धा सोशल मीडियावर लोकांचा कल कोणत्या दिशेला आहे त्यावर लक्ष ठेवून असतात.
अलीकडील काळात आपण बघतोय की, बऱ्याच मोठ्या बातम्यांचा उगम सोशल मीडिया मधून झालेला आहे. समाजाशी जुळलेल्या आणि महत्वाच्या समस्यांना चव्हाट्यावर आणण्यासोबतच सोशल मीडिया ने शासनाची जनतेशी तुटलेली नाळ सुद्धा उघड केली आहे. आपल्या नेत्यांची काय करत आहेत याबद्दल जनता जागरूक झालेली आहेच, सोबतच कायदे आणि योजना त्यांना कशा प्रभावित करत आहेत ह्याबद्दल ही त्यांची विचारांची देवाणघेवाण सुरु असते. ते दिवस आता गेलेत जेव्हा सरकार बंद दाराआड कायदे बनवीत असे आणि जनतेला काही महिन्यानंतर लक्षात येत असे. राजकीय विषयांवर आणि त्यावरील परिणामांवर चर्चा व्यापक आणि त्वरित होत असल्याने सोशल मीडिया (Facebook, Instagram, twiter)चे आभार मानायला हवे.
लोकांना एकत्र आणण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी आहे त्याच बरोबर सामाजिक बदलासाठी ते प्रभावी माध्यम असल्याचे आश्वासन देते. एवढ्यात आपण बघितले आहेच की सोशल मीडियावर आयोजित केलेले विरोध प्रदर्शने यशस्वीपणे अंमलात आणली गेली आणि त्यांचा योग्य परिणामही झाला. भारतात उपलब्ध असलेली पण अद्याप उपयोगात न आणली गेलेली मनुष्यबळाची विशाल विविधता प्रभावीपणे उपयोगात आणणे हाही सोशल मीडियाचा दुसरा उपयोग असू शकतो.
(2) प्रसार माध्यमांची आवश्यकता.
उत्तर:-
i)वर्तमानपत्रे_
ii) आकाशवाणी_
iii) दूरदर्शन_
iv) आंतरजाल
१. प्रसारमाध्यमांचे प्रमुख कार्य हे माहिती व सत्य समाजापर्यंत पोहोचवणे हे असते.

२. माहिती ही मुक्त व सत्य प्रवाहात समाजात पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.

३. प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची आधारस्तंभच असतात. त्यामुळे, लोकशाही अधिक सुदृढ व मजबूत होण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.

४. समाजातील घडामोडी व सरकारच्या योजना लोकांना दाखवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.

५. प्रसारमाध्यमांमुळे लोकशिक्षण तसेच समाजप्रबोधन होण्यास मदत मिळते.

६. प्रसारमाध्यमांमुळे माहितीची देवाणघेवाण होते. ज्ञानाचा प्रसार होते

(३)प्रसारमाध्यमांची विविध कारणांसाठी आवश्यकता 

१. प्रसारमाध्यमांचे प्रमुख कार्य हे माहिती व सत्य समाजापर्यंत पोहोचवणे हे असते.

२. माहिती ही मुक्त व सत्य प्रवाहात समाजात पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.

३. प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची आधारस्तंभच असतात. त्यामुळे, लोकशाही अधिक सुदृढ व मजबूत होण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.

४. समाजातील घडामोडी व सरकारच्या योजना लोकांना दाखवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.

५. प्रसारमाध्यमांमुळे लोकशिक्षण तसेच समाजप्रबोधन होण्यास मदत मिळते.

६. प्रसारमाध्यमांमुळे माहितीची देवाणघेवाण होते. ज्ञानाचा प्रसार होतो.

अधिक माहिती:

(४) प्रसारमाध्यमे:

जी माध्यमे माहितीचा प्रसार करतात म्हणजेच माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवतात, त्यांना प्रसारमाध्यमे म्हणतात.

२. पूर्वीच्या काळात राजेमहाराजे यांच्या सूचना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावांत दवंडी पिटली जात असे.

३. एकाकडून दुसऱ्यालादुसर्‍याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रसार होत असे.

४. कालांतराने, वृत्तपत्रेनियतकालिके ही प्रसारमाध्यमे म्हणून अस्तित्वात आली.

५. वर्तमानपत्र हे माहितीचे तसेच ज्ञानाचेही साधन बनले.

(५) ब्लॉग:-
ब्लॉग एक ऑनलाइन जर्नल आहे जिथे लोक त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबद्दल लिहितात.
ब्लॉग म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर एक अशी ऑनलाईन जागा जिथे आपण आपल्या विचारांना कोणत्याही भाषेतील लेख आणि चित्रांच्या माध्यमाने इंटरनेटवर प्रकाशित करू शकतो. ब्लॉग वर कोणत्याही प्रकारचा लेख लिहिला जाऊ शकतो. ब्लॉग वर तुम्ही वैयक्तिक जीवनातील प्रसंग, वाचकांसाठी उपयुक्त माहिती तसेच लोकांना ज्या गोष्टी वाचण्यात आवड असेल त्या सर्व गोष्टी तुम्ही लिहू शकतात. ब्लॉग हा एका डिजिटल मासिक प्रमाणे असतो.

ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद्या कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र व चित्रफिती वगैरे गोष्टी इंटरनेटच्या आधारे सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बनवतात. अनुदिनी बहुधा एका व्यक्तीने तयार केलेली असते

05 December 2022